तुझी आईं निर्मळ मनाची आहे आणि तु पण खूपच संस्कारी आहेस बाळा..अनेक आशीर्वाद तुला.
नर्मदे हर .....शुध्द बीजा पोटी फळे रसाळ गोमटी.....आज समजले स्वानंदी सारख्या रसाळ फळांचे गुपीत....मायलेकींना ❤
रस्त्यात भेटलेले रिक्षा करून दिलेले गृहस्थ म्हणजे अश्वत्थामा होते, नर्मदा परिक्रमा करताना कुठे ना कुठे कधी ना कधी अश्वत्थामा यांचे दर्शन कुठल्याही रुपात होतेच. नर्मदे हर 🙏
आई सकट तुमच्या घरच्या सर्वास अनेक शुभेच्छा.अशी घर बघायला मिळणं आता दुर्मिळ झालय. एकूण तुझे हे घरचे व्हिडीओ बघताना खूप सुख, शांती,समाधान का कुणास ठाऊक पण ,वाटत.तुझ्या वागण्या बोलण्यातले संस्कार हे तिथूनच आलेत कळत. एक खासियत तुझ्या बोलण्यातली जाणवली ती म्हणजे,वाक्यात एक शब्द दीर्घ उच्चारतेस.😊 संगीत शिकण,पशुधनावर प्रेम करत्येस,जन्म दात्यांना अभिमान वाटावा अशी लेक मिळण्याचं भाग्य त्यांना मिळालंय. अगदी स्वप्नातलं घर आहे तुमचं.आणि ते असच नांदत, फुलत,बहरत राहो.🎉🎉🎉 नर्मदे हर...
Very nice ❤❤❤
नर्मदा परिक्रमा ही अतिशय अवघड अशी परिक्रमा आहे. त्याला निग्रह, धैर्य, चिकाटी,उत्तुंग मनोबल आणि ईश्वरी पाठबळ असणे आवश्यक आहे. नक्कीच तुझ्या आईची काहीतरी पुण्याई असेल, ज्यामुळे ही परिक्रमा घडू शकली. तुझ्या आईला अनेक अनेक हार्दिक शुभेच्छा आणि हो, नेहमीप्रमाणे उत्तम ब्लॉग झाला आहे.
तुझा ब्लॉग आणि तुझं गोड,प्रेमळ,रसाळ बोलणं कधिच संपु नये असे वाटतं खूप खूप आशिर्वाद बाळा.नर्मदे हर
आईची कमाल आहे. सुविधा सुरक्षा भेटेल, नाही भेटेल याची खात्री नाही. त्यात सामान घेऊन 4 महिने यात्रा करणे म्हणजे कमाल आहे 🙏
अनुभव सांगताना आईचे डोळे पाणावले, म्हणजेच तिला परिक्रमेतून मिळालेलं सुख, समाधान दिसून आलं...🙏😊❤
स्वानंदी तुझ्या आईची नर्मदा परिक्रमा उत्तम रित्या परिपूर्ण झाली त्या साठी तुम्हा परिवारास आरोगेम धन संपदा आणी खूप खूप शुभेच्या. हर हर् नर्मदे मय्या जय गंगा मैया.
शुद्ध बिजा पोटी फळे रसाळ गोमटी. हे वाक्य संत तुकाराम महाराजांनी आपल्या वाणीतून लिहुन ठेवलेले आज कुठे त्याचा अनुभव पहायला भेटला. खुप छान संस्कार आहेत तुमच्या आईचे आणि तुमचे पण .
😇सर्वप्रथम आई तुमच्या चरणी साष्टांग नमस्कार 🙏 मनात नर्मदा आईबद्दल असलेला निस्वार्थ प्रेमळ भाव , तिच्या बद्दल असलेली निर्मळ करूणा यांमुळे नर्मदा आई कळत नकळतपणे वेगवेगळ्या वाटेंवर ,वेगवेगळ्या रूपात , विविध प्रकारे या पायी यात्रेत तुमच्या सोबतीला तुमच्या पाठीशी होत्या😇 , हाच अनुभवी रूपी आईचा आशीर्वाद तुम्हाला लाभला 🤗 स्वानंदी आईंची काळजी घे खूप दुरची यात्रा करून आल्या आहेत आई नर्मदे हर हर🙏
तुझ्या आईचे सर्व गुण तुझ्यात उतरले आहेत खाण तशी माती ❤❤🎉
स्वानंदी अगदी नावा प्रमाणेच तू गोड आहेस,अश्या भावनिक ,धार्मिक आणि जबरदस्त इच्छाशक्ती असलेल्या तुझ्या मैयाला साष्टांग नमस्कार . तुझं चित्रफित (व्हिडिओ)मधील वावरण,बोलणं अगदी सालस,सुसंस्कृत आणि निरागस वाटतं.मी तुझा चाहता झालोय. अशीच रहा मोठी हो ! हा तुला आशीर्वाद मुली..🙏नर्मदे हर 🌺
निखळ भक्ती आणि ध्यास कळून येतो आईंच्या डोळ्यातून आज पहिल्यांदा डोळ्यात पाणी आलं अनुभव ऐकताना...साष्टांग दंडवत आईंना...नर्मदे हर हरSSSS🥺🥺
बेटा,आई खुप भाग्यवान आहे तुझी जिला नर्मदेसारखी खळाळती लेक आहे तुझ्या रुपात. नर्मदे हर ❤
स्वानंदी तुझे हल्ली विडिओ बघायला सुरवात केली आहे, आणि सगळेच विडिओ पाहण्याची उत्सुकता आहे. तुझा स्वभाव, तुझा आवाज, तुझं गाणं खूपच अप्रतिम. एका विडिओ मध्ये तुझं आणि प्राण्यांमधलं connection किंवा संवाद बघून डोळ्यात पाणी आलं कोकणातले आता पर्यंत konkaniranmanus हह्याचे विडिओ पाहायचे आणि आता तुझे हि व्हिडिओस पाहणार आहे. तुझं असाच काम कायम ठेव. मी पण लांजा मधली 😊 Loads of Love from Dubai 🥰
फारच उत्कृष्ट... आईचे संस्कार दिसतात तुझ्यामध्ये... तुम्हा सर्वांना नमस्कार...
काय बोलावं कळतं नाही.आईचे अनुभव ऐकताना काहीतरी खूप चांगलं ऐकायला,बघायला मिळतय याची जाणीव झाली.दिवस सार्थकी लागला.स्वानंदी नावाप्रमाणे आनंद देतेस.❤
@pandurangdombale2229